Latest

ब्रेकिंग : डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मोठा दिलासा ! उच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा बँकेतला प्रवेश पक्का !

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. काय आहे अपडेट? सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी डॉक्टर विखे यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर विरोधी उमेदवार एकनाथ घोगरे यांनी हरकत घेतली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी ही हरकत फेटाळल्यानंतर घोगरे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मंजुषा अजय देशपांडे यांच्यासमोर झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने घोगरे यांची याचिका फेटाळली.

न्यायालयाच्या निर्णयामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतील मार्ग आता सुकर झाला असून, राहाता सेवा सोसायटी मतदारसंघातून बँकेच्या संचालक पदावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button