Latest

ब्रेकिंग : शिर्डी रेल्वेस्थानकावर आढळला तरुणाचा मृतदेह… ओळख अजूनही गुलदस्त्यात! नेमकं काय घडलं?

शिर्डीच्या साईनगर रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमक काय आहे प्रकरण? सगळं सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ३० ते ३५ वर्षांचा एक अनोळखी तरुण बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उघडकीस आली. स्टेशन मास्तरांनी याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत तरुणाची उंची साधारण पाच फूट दोन इंच असून, त्याने पांढरे ठिपके असलेला काळा शर्ट आणि काळी पँट घातली होती. त्याच्या उजव्या हातावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीसह ‘गोविंद’ हे नाव गोंदलेलं आहे. हातावर फोटोही गोंदलेला आहे.

या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या तरुणाला ओळखत असाल किंवा त्याच्या कुटुंबीयांबाबत माहिती असेल, तर साईनगर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधा. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button