Latest

नेपाळच्या भक्ताने जिंकली साईभक्तांची मनं ? शिर्डीत असं काय अर्पण केलं ?

शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नेपाळमधील भक्ताने खास भेट अर्पण केली आहे. या भेटीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. नेमकी काय आहे ही भेट? सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, नेपाळमधील बिराटनगर येथील साईभक्त डॉ. बिरेन्द्र कुमार बिस्ता आणि त्यांच्या परिवाराने साईबाबांना ९७७ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाला आकर्षक सोनेरी मुलामाही देण्यात आला आहे.

डॉ. बिस्ता यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून साईबाबांचे भक्त आहे. दरवर्षी हे कुटुंब श्रद्धेने शिर्डीत दर्शनासाठी येते. याच श्रद्धेतून आणि साईबाबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा मुकुट अर्पण केला.

या देणगीबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉ. बिस्ता आणि त्यांच्या परिवाराचा शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे, हा चांदीचा मुकुट लवकरच साईबाबांच्या उत्सव मूर्तीला परिधान करण्यात येणार आहे.

नेपाळपासून शिर्डीपर्यंत पोहोचलेली ही भक्ती साईभक्तांसाठी श्रद्धेचा एक सुंदर क्षण ठरली आहे. तुम्हाला नेपाळच्या साईभक्तांची ही श्रद्धा कशी वाटली? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button