Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेचा फैसला आज ! ‘या’ पाच जागांवर पेच, निवडणुक बिनविरोध होणार का ?

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की नेत्यांमध्ये राजकीय सामना रंगणार? याचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमक काय घडतंय? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करा.

मंडळी, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होऊनही पाच महत्त्वाच्या मतदारसंघांमधील तिढा अद्याप सुटलेला नाही. पारनेर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत आणि श्रीरामपूर या पाच जागांवर उमेदवारीवरून पेच कायम आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय.

पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. अकोल्यात आमदार किरण लहामटे, श्रीगोंद्यात आमदार विक्रम पाचपुते, कर्जतमध्ये प्रा. राम शिंदे आणि श्रीरामपुरात आमदार हेमंत ओगले यांच्या मतदारसंघातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दरम्यान, नेवासा आणि संगमनेर हे सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झाले आहेत. इतर जागांवरही उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. आज दुपारी तीननंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आता प्रश्न एवढाच, नेत्यांची एकी टिकणार की निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळणार? तुमच्या मते जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होईल की मतदान होईल? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button