
राहुरी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमालपूर येथील ३२ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, २० ऑक्टोबर रोजी वांबोरीजवळील कुक्कडओढा परिसरात गणेश गायकवाड यांचा मृतदेह आढळला. याप्रकरणी गणेश यांचे भाऊ प्रदीपने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, १७ ऑक्टोबरच्या रात्री प्रदीप यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. गणेश हा शिंगवे नाईक येथील एका घरात शिरताना आढळल्याने त्याला पकडून ठेवल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर चौकशीदरम्यान गणेश यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याची माहिती मिळाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी योगेश जाधव आणि महेश जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. तुमच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा.





