
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे ! अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.
प्रारूप यादीत ३ हजार ६७७ मतदार होते. त्यावर आलेल्या २३८ हरकतींची छाननी केल्यानंतर अंतिम यादीत तब्बल ३ हजार ८३६ मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच १५९ मतदारांची वाढ झाली आहे.
या वाढीचा सर्वाधिक परिणाम संगमनेर मतदारसंघात होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. न्यायालयीन स्थगिती आणि सहकारी संस्थांशी संबंधित निर्णयांमुळे काही संस्थांच्या प्रतिनिधींना मतदार यादीत स्थान मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या संचालकांची मुदत २० फेब्रुवारीलाच संपली होती. मे महिन्यात बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. आता अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने निवडणुकीचे बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे निवडणूक जाहीर होण्याआधीच ती बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागे सर्वपक्षीय चर्चांना वेग आल्याचे चित्र आहे.





