Latest

मोठी बातमी : हवामानात अचानक मोठा बदल, महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान ! ‘या’ २१ जिल्ह्यांना अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती ?

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून आज अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे.

हवामान विभागाने जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील काही तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असून, काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button