
दिवाळीच्या खरेदीसाठी सोने घेण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे! काय आहे नवीन अपडेट? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, गेल्या दीड महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल १२ हजार १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, अहिल्यानगरच्या सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.
१ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख ५६ हजार ७०० रुपयांवर पोहोचला होता. मात्र, आता २२ ऑक्टोबर रोजी हाच दर १ लाख ४४ हजार ६०० रुपयांवर आला आहे. म्हणजेच दीड महिन्यात सोनं प्रतितोळा १२ हजार १०० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
कापड बाजार, तेली खुट, सर्जेपुरा, सराफ बाजार आणि सावेडी परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत आहे. सराफा सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पण सोन्याचे भाव आणखी कमी होतील का? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा!





