Latest

अहिल्यानगरमधील गणेश मंडळांसाठी मोठी बातमी ! DJ वाजवल्यास गणेश मंडळासह ‘या’ लोकांवरही गुन्हा दाखल होणार !

अहिल्यानगरमधील गणेश मंडळांसाठी एक मोठे अपडेट समोर येत आहे. नगर तालुका पोलिसांनी गणेश मंडळांना स्पष्ट इशारा दिला आहे.

न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवल्यास केवळ मंडळावरच नाही, तर डीजे चालकावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. एवढंच नाही, तर संबंधित डीजे जप्त करून कठोर कारवाई केली जाईल.

गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ६९ गावं येतात. या गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलिसांनी नियमांची माहिती दिली.

डीजेऐवजी भजन, कीर्तन, व्याख्यानं, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवणाऱ्या गावांना बक्षीसही दिलं जाणार आहे.

ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नियमांचं पालन करण्याची जबाबदारी मंडळांसह नागरिकांचीही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button