Latest

गणेशोत्सव 10 की 12 दिवसांचा ? गणेशमूर्तीची स्थापना कधी करायची ? मनात संभ्रम असेल तर ही माहिती नक्की पाहा !

मंडळी, यंदा गणेश चतुर्थी आणि हरितालिका पूजन एकाच दिवशी, म्हणजेच १४ सप्टेंबरला सोमवारी येत आहेत. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया तिथी संपणार असली, तरी त्यानंतरच गणेशपूजन करावे, असा कोणताही नियम नाही.

भाविकांना पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५१ मिनिटांपर्यंत आपल्या सोयीनुसार गणेशमूर्तीची स्थापना आणि पूजा करता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र शुभमुहूर्ताची आवश्यकता नसल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी स्पष्ट केले आहे.

यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून, अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबरला आहे. गौरी आवाहन १७ सप्टेंबरला, गौरी पूजन १८ सप्टेंबरला आणि गौरी विसर्जन १९ सप्टेंबरला करता येणार आहे. म्हणून गणेश चतुर्थीच्या तारखेबाबत संभ्रम ठेवू नका… बाप्पांचे आगमन १४ सप्टेंबरलाच होणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button