
शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत असून अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी भाव नोंदवला गेला आहे!
मंडळी, जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याची मोठी आवक पाहायला मिळाली. बाजारात एकंदर ४ हजार ९४४ कांदा गोण्यांची नोंद झाली असून, दर्जेदार कांद्याला ६ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला आहे.
प्रतवारीनुसार पाहिल्यास, एक नंबर कांद्याला ४५०० ते ६००० रुपये, दोन नंबर कांद्याला २९०० ते ४४५० रुपये, तर तीन नंबर कांद्याला १२५० ते २८५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. याशिवाय गोल्टी कांद्याला १५०० ते ४००० रुपये आणि जोड कांद्याला ७०० ते २००० रुपयांचा दर मिळाला.
दुसरीकडे डाळिंबाची ७ हजार ९३८ क्रेट्स इतकी मोठी आवक झाली. यामध्ये एक नंबर डाळिंबाला १६१ ते २७५ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला, तर दोन नंबर डाळिंबाला १०१ ते १६० रुपयांपर्यंत दर मिळाला. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे.





