
गुगलवर काहीही सर्च करता येतं, असं तुम्हालाही वाटतंय का ? मग थांबा! कारण इंटरनेटवर काही गोष्टी शोधल्यास थेट तुरुंगात जावे लागू शकत. नेमके कसे आहेत नियम ? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, पहिली गोष्ट म्हणजे पायरेटेड चित्रपट. कॉपीराइट असलेल्या चित्रपटांच्या बेकायदेशीर प्रती डाउनलोड करणं किंवा शेअर करणं कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतं.
दुसरी गोष्ट म्हणजे गर्भपात. भारतात गर्भपातासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. मात्र, केवळ याबाबत गुगलवर माहिती शोधणं हा गुन्हा नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे बाल लैंगिक शोषणाशी संबंधित अश्लील सामग्री. अशी सामग्री पाहणं, साठवणं किंवा प्रसारित करणं गंभीर कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.
चौथी गोष्ट म्हणजे पीडितेची ओळख उघड करणारी माहिती प्रसारित करणं. यावर कायदेशीर निर्बंध आहेत. आणि पाचवी गोष्ट म्हणजे हॅकिंग. दुसऱ्याच्या खात्यात बेकायदेशीर प्रवेश करणं किंवा सायबर गुन्ह्यांना मदत करणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. लक्षात ठेवा, प्रत्येक सर्च गुन्हा नसतो; कृती आणि हेतू महत्त्वाचे असतात. तुम्हाला हे नियम माहिती होते का ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





