
अहिल्यानगरचे जेष्ठ शिवसैनिक अंबादास पंधाडे यांचे आज वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज त्यांच्या जाण्याने जुन्या शिवसैनिकांच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. असं सांगतात की, १९९६ मध्ये बाळासाहेबांनी अंबादास पंधाडेंनी उमेदवारी दिली होती पण त्यांनी स्वतः नकार दिला. नेमका काय होता हा रंजक किस्सा? सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
पंधाडे हे बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं. १९९६ मध्ये अनिल राठोड यांच्या उमेदवारीचा विषय बाळासाहेब ठाकरेंसमोर गेला होता. त्यावेळी राठोड यांच्यासाठी शिष्टाई करणाऱ्या पंधाडे यांनाच बाळासाहेबांनी उमेदवारी देऊ केली होती.
मात्र, पंधाडेंनी स्वतःसाठी उमेदवारी स्वीकारण्याऐवजी अनिल राठोड यांच्यासाठीच आग्रह धरला. हा प्रसंग त्यांच्या राजकीय निष्ठेची आठवण करून देतो. पुढे राठोड यांच्याशी राजकीय मतभेद झाले, संघर्षही झाला; पण पंधाडेंनी शिवसेनेची साथ सोडली नाही. अशा या कट्टर शिवसैनिकाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला अंबादास पंधाडे यांच्याविषयी काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा.





