
अहिल्यानगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा बनावट नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये बनावट नोटांचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय!
कोळगाव येथील आर. जे. पेट्रोल पंपावर एका व्यक्तीने डिझेल भरल्यानंतर ५०० रुपयांची बनावट नोट दिल्याचा आरोप आहे. यावेळी पंपावर गोंधळ सुरू झाला आणि नेमका प्रकार पोलिसांच्या लक्षात आला.
विशेष म्हणजे, त्याचवेळी कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेमणुकीला असलेले पोलीस शिपाई इरफान शेख हे आपल्या खासगी वाहनात डिझेल भरण्यासाठी तिथे आले होते.
पोलिसांनी तपासणी केली असता, किरण भोसले याच्याकडे ५०० रुपयांच्या तब्बल ७३ बनावट नोटा आढळल्या. या नोटांसह दुचाकी असा एकूण ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्या हातात बनावट नोट आली तर काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा.





