Latest

संगमनेरच्या भोंदू राजेंद्र गडगेवर आणखी एक गुन्हा दाखल ! मुलगा होण्यासाठी द्यायचा असं औषध, काय आहे नेमक प्रकरण ?

संगमनेरमध्ये भोंदू राजेंद्र गडगे आणि मोहन पुरी यांच्याविरोधात आणखी एक महत्त्वाची कारवाई समोर आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲड. रंजना गवांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडगे याच्यावर भक्तांना मुलगा होण्यासाठी उपाय आणि आश्वासने दिल्याप्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव पान येथील आश्रमात अशा प्रकारचे उपाय सांगितल्याचे व्हिडिओ उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने गडगे याला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे, मोहन पुरीच्या सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील औषधनिर्मिती प्रकल्पाची पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली होती.

नमुने प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर काही औषधे बनावट आणि हानिकारक असल्याचा अहवाल आल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणातही न्यायालयात गुन्हा दाखल झाला असून गडगे आणि पुरी यांना समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button