
दिवाळी जवळ आलीये… पण यंदा शिधापत्रिकाधारकांना मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ नेहमीसारखा १०० रुपयांत मिळणार नसल्याची शक्यता आहे!
महायुती सरकारकडून यंदा वेगळा पर्याय विचाराधीन आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना साखर, डाळ आणि खाद्यतेल बाजारभावापेक्षा कमी दरात देण्याची योजना आखली जात आहे.
गेल्या काही वर्षांत १०० रुपयांत रवा, साखर, चणा डाळ आणि तेल दिलं जात होतं. मात्र वाढलेल्या महागाईमुळे आता १०० रुपयांत हे सर्व देणं शक्य नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
साखरेचा दरही सध्या किलोमागे ५५ ते ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यासाठी महाराष्ट्र सरकार आसामच्या मॉडेलचा अभ्यास करत आहे. तिथे डाळ, साखर आणि मीठ अनुदानित दरात दिलं जातं.
दर किती कमी असतील, किती वस्तू मिळतील आणि सरकारवर किती आर्थिक भार पडेल, याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे. म्हणजेच… यंदाच्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ की स्वस्त धान्याचा नवा फॉर्म्युला? याकडे राज्याचं लक्ष लागलंय!





