Latest

अहिल्यानगर जिल्हा बँकेचं ठरलं ! ‘या’ १० जागांसाठी २७ उमेदवार मैदानात, ६ जागांवर थेट आणि ४ जागांवर बहुरंगी लढत

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता खरी रंगत येणार आहे ! कारण दहा जागांसाठी २७ उमेदवार मैदानात असून, काही मतदारसंघांत थेट सामना, तर काही ठिकाणी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पण, कोणत्या जागांवर कोणते उमेदवार उभे आहेत? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी अकोलेमध्ये आमदार किरण लहामटे विरुद्ध संजीवनी शिंदे, कर्जतमध्ये तुषार पिसाळ विरुद्ध ज्योती शिंदे, पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे, तर राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे विरुद्ध सत्यजित कदम अशी लढत होणार आहे.

शेतीपूरक मतदारसंघात आमदार आशुतोष काळे विरुद्ध सुधीर म्हस्के यांच्यात सामना रंगणार आहे. महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी हर्षदा काकडे, पुष्पा गायकवाड, मंजुषा गुंड, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, संध्या महांडुळे आणि संगीता वाघ हे सात उमेदवार रिंगणात आहेत.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात वैभव पिचड विरुद्ध प्रशांत लोखंडे, तर ओबीसी मतदारसंघात पाच उमेदवार आमनेसामने आहेत. भटक्या-विमुक्त मतदारसंघातही तिरंगी लढत होणार आहे. कोणत्या मतदारसंघातील लढत सर्वाधिक चुरशीची ठरणार? कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button