
दिवाळीच्या खरेदीआधी चांदी घेण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे ! काय आहे नवीन अपडेट, सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी केंद्र सरकारने चांदीचा पुरवठा वाढवण्यासाठी तब्बल ६ हजार टनांपर्यंत चांदी आयात करण्यासाठी परवानग्या दिल्या आहेत. यामुळे चांदीचे दर कमी होणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
दिवाळी आणि लग्नसराईमध्ये चांदीच्या दागिन्यांना, पूजेच्या वस्तूंना आणि भेटवस्तूंना मोठी मागणी असते. त्यामुळे बाजारात चांदीची उपलब्धता वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या आयातीमुळे देशांतर्गत बाजारातील चांदीची टंचाई कमी होऊ शकते. तसंच आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा भारतात आकारला जाणारा अतिरिक्त दरही कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या! चांदी स्वस्त होईलच, याची खात्री नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि प्रत्यक्ष आयात किती होते, यावर दर अवलंबून असतील. पण, तुमच्या मते दिवाळीपूर्वी चांदी स्वस्त होईल का? कमेंट करून नक्की सांगा.





