Latest

अहिल्यानगर ब्रेकिंग : पठारे बंधूंवर पुन्हा मोक्का ! २२४१ पानांचं दोषारोपपत्र, काय आहे नेमक प्रकरण ?

अहिल्यानगरमध्ये पठारे बंधूंविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विजय राजू पठारे आणि अजय राजू पठारे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मोक्काअंतर्गत तब्बल २ हजार २४१ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

१५ मार्च रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पाच आरोपी होते. मात्र, अपर पोलिस महासंचालकांच्या मंजुरीनंतर विजय आणि अजय पठारे या दोघांवरच मोक्काची कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय पठारे याच्यावर तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे, तर अजय पठारे याच्यावर तोफखाना आणि कोतवाली पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल आहेत.

२०१८ ते २०२६ या काळात खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, खंडणी, मारामारी आणि दंगलीसारख्या गुन्ह्यांचे आरोप त्यांच्यावर आहेत. २०२१ मध्येही दोघांवर मोक्का कारवाई झाली होती. त्यामुळे ही दुसरी मोक्का कारवाई ठरली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button