
अहिल्यानगरमध्ये घरगुती वादातून पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पती ज्ञानेश्वर सुरेश चौधरी याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
इंगळे वस्ती येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर चौधरीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२६६/२०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिसरातील रहिवासी, सरकारी पंच, डॉक्टर आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. बचाव पक्षाने या साक्षींची उलटतपासणी करत विविध मुद्दे न्यायालयासमोर मांडले.
उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने २१ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर चौधरी याची निर्दोष मुक्तता केली.
बचाव पक्षातर्फे ॲड. महेश तवले, ॲड. संजय दुशिंग आणि ॲड. सतीश गिते यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे ॲड. आश्विनी गिते, माधुरी नाणेकर, अमर निमसे, अनिकेत जाधव आणि अक्षय हुलगे यांनी बाजू मांडली.





