
फक्त एका विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या अर्जाबाबत मेसेज केला, म्हणून १९ वर्षीय तरुणाला जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्जतमध्ये घडली आहे. नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर क्राईमला फॉलो नक्की करा.
मंडळी, अनिकेत काळदाते हा दादा पाटील महाविद्यालयात बीसीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. २६ नोव्हेंबरला पेपर देऊन बाहेर पडताच दोन तरुणांनी त्याला अडवलं आणि जबरदस्तीने दुचाकीवर बसवून बहीरोबावाडीच्या जंगलात नेलं.
तिथे आणखी काही जण आले. विद्यार्थिनीला मेसेज का केला, असा जाब विचारत लाकडी दांडके, साखळी आणि चैनने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात अनिकेतच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीचं चित्रीकरणही करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी चिंचोली काळदातच्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. तर मग मंडळी या घटनेवर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.





