Latest

पती-पत्नीच्या भांडणात तिसऱ्याचा बळी….! तरुणाची निर्घृण हत्या, अहिल्यानगरमध्ये नेमक काय घडलं ?

नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारातील चिंतामणी डोंगर परिसरात धक्कादायक खूनाची घटना घडली. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी किरण रोहिदास भोसले हे तिथे गेले होते.

मात्र, वाद सोडवण्याच्या प्रयत्नात आरोपी हरीश गुलाब काळे याच्यासोबत त्यांचा वाद झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने किरण यांच्यावर लोखंडी कत्तीने तोंड, छाती आणि पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

किरण यांना तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. नगर तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडूनही शोधमोहीम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button