
अहिल्यानगरच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक मोठी आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर येथील स्वस्तिक हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांची मॉस्को, रशिया येथे होणाऱ्या XIX All-Russian Ophthalmology Forum मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.विशेष म्हणजे भारतातून फक्त दोन डॉक्टर्स यासाठी निवडले गेले आहेत.
२३ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय नेत्ररोग परिषदेत डॉ. चौधरी तज्ज्ञांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, संधिवातामुळे कॉर्नियाला पडलेल्या छिद्रावर करण्यात येणारी ‘केळ्याच्या आकाराची’ अर्धचंद्राकृती टेक्टॉनिक केराटोप्लास्टी ही दृष्टी वाचविणारी अत्याधुनिक आपत्कालीन शस्त्रक्रिया ते या परिषदेत सादर करणार आहेत.
अहिल्यानगरमधील एका डॉक्टरने थेट रशियात जाऊन आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर आपल्या वैद्यकीय अनुभवाचे सादरीकरण करणे, ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. स्वस्तिक हॉस्पिटल आणि डॉ. प्रफुल्ल चौधरी यांच्या या कामगिरीमुळे अहिल्यानगरचे नाव आंतरराष्ट्रीय वैद्यकीय व्यासपीठावर पोहोचत आहे.





