Latest

खड्डा खोदला…कापूर, अगरबत्ती आणि मंत्रोच्चार सुरु झाले…; अकोलेत घडला धक्कादायक प्रकार ! मनसेच्या ‘या’ नेत्यासह ७ जणांवर गुन्हा

अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात शेतात गुप्तधन शोधण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. नेमकं काय घडलं ते सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, २७ ऑक्टोबरच्या रात्री भंडारदरा परिसरातील शेंडी गावठाण शिवारात काही जण शेतात घुसले. त्यांनी खड्डा खोदला, कापूर आणि अगरबत्ती पेटवली, मंत्र म्हणायला सुरुवात केली. गुप्तधन काढून देतो, असं सांगून पैशांची मागणीही केल्याचा आरोप आहे.

ग्रामस्थांनी जाब विचारला, तेव्हा टोळक्यातील एकाने आपण पोलीस असल्याचं सांगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी थेट ११२ क्रमांकावर फोन केला आणि पोलिसांना बोलावलं.

या प्रकरणात मनसेचे राजूर विभागाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर लेंडे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पूजेचं साहित्य आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडू नका. अशी घटना दिसल्यास पोलिसांना कळवा. तर मग मंडळी तुमच्या परिसरातही असे प्रकार घडतात का? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button