
नेवासा तालुक्यातील चांदा गावातील २५ वर्षीय युवकाचा मृतदेह कालव्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणासोबत नेमकं काय घडलं? ही घटना कशी समोर आली? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, सोमनाथ रामदास थोरात असं मृत युवकाचं नाव आहे. सोमनाथचं अपहरण झाल्याची तक्रार सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी फसवणूक करून त्याचं अपहरण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मात्र, बुधवारी सकाळी चांदा-पिंपळगाव रस्त्यावरील मुळा उजव्या कालव्याच्या पुलाच्या पूर्वेकडे सोमनाथचा मृतदेह आढळून आला. ही बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
गावचे पोलीस पाटील कैलास अभिनव यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सोनई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासा येथे पाठवण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. तर मग मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? खाली कमेंट करून नक्की सांगा.





