Latest

ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या ‘या’ १६१० गावातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार ५ हजार रुपये ! पण ही एक नोंदणी केली नसेल, तर मदत अडकणार !

यंदा पावसाने दगा दिल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता या शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय झालं ? सांगतो. त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पाहा आणि अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका. मंडळी, जिल्ह्यातील १ हजार ६१० गावांमधल्या १२ लाख १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय.

तब्बल ९ लाख ६२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून, प्रशासनाने १ हजार ३६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय. आता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत थेट जमा करण्याची तयारी आहे. पण थांबा!

यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि बँक खात्याचं ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर मदतीला मंजुरी मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमची नोंदणी आणि ई-केवायसी तातडीने पूर्ण करा. तर मग मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला ? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button