
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करायला गेलेल्या महसूल विभागाच्या पथकालाच धमकावलं गेलं, तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कुणाकडे ? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे राहुरीत. नेमकं काय घडलं ? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, २७ ऑक्टोबरला सायंकाळी प्रांताधिकारी विनीत शिर्के हे प्रवरा नदीपात्रातील वाळू गटाची पाहणी करून परतत होते. त्याचवेळी पिंपळगाव फुणगी परिसरात त्यांना मुरूम भरलेला हायवा डंपर दिसला.
यावेळी डंपरवरील चालक धनराज चौधरी, दीपक ऊर्फ प्रवीण लाटे आणि इतर व्यक्तींनी पथकाला अडवून धमकावल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर वाहनाखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात तडीपार आरोपीचा वावर आणि वाळूतस्करीशी संबंध असल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागलंय. तर मग मंडळी तुमच्याकडे कधी असं घडलंय का? कमेंट करून नक्की सांगा.





