
तुम्ही घर बंद करून बाहेरगावी जाताय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ! मंडळी अहिल्यानगरमध्ये बंद घरं शोधून घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. नेमकं काय घडलं, ते सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, १३ ऑक्टोबरला शिवनेरी चौकातील मातोश्री अपार्टमेंटमध्ये विवेक साखरे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती.
या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी नेवासा फाटा परिसरातून मध्यप्रदेशातील कपिल चावडा याला पकडलं. चौकशीत त्याचा साथीदार राजा पटेल याचंही नाव समोर आलं.
विशेष म्हणजे, चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील अनिल तिवारी आणि भारत जोशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईत एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही टोळी बंद घरांवर पाळत ठेवून संधी साधत असल्याचं तपासात समोर आलंय. त्यामुळे घर बंद करताना काळजी घ्या. तर मग मंडळी तुमच्या परिसरातही अशा घटना घडल्या आहेत का? कमेंट करून सांगा !





