Latest

अहिल्यानगरमध्ये फ्लेक्सबाजीला कायमचा ब्रेक ! कधीपासून लागू होणार नवा निर्णय ?

अहिल्यानगरमध्ये आता वाढदिवस असो, नेत्यांचं स्वागत असो किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम… रस्त्यावर फ्लेक्स लावता येणार नाहीत! एवढंच नाही, तर परवानगी घेऊनही फ्लेक्स लावण्याची सुविधा बंद होणार आहे. हा निर्णय नेमका कसा आहे? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, अहिल्यानगर शहराला फ्लेक्समुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून शहरात कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स किंवा बॅनर लावण्यास परवानगी दिली जाणार नाही.

४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नियम मोडून फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

तसेच फ्लेक्स हटवण्यासाठी महापालिकेला आलेला खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाणार आहे. पैसे न भरल्यास ही रक्कम घरपट्टीत जोडली जाणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला महापालिकेचा हा निर्णय कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button