Latest

राहुरीतील बहुचर्चित सुधाकर थोरात खून प्रकरणात नवा ट्विस्ट… मुख्य आरोपीला न्यायालयाचा जामीन मंजूर !

राहुरीतील बहुचर्चित सुधाकर थोरात खून प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मंडळी, फिर्यादित मृत सुधाकर थोरात यांच्या खून प्रकरणात ज्ञानदेव हा मुख्य आरोपी आहे. सुधाकर थोरात यांच्या पत्नीचे आणि ज्ञानदेवचे अनैतिक संबंध असून या संबंधांमध्ये सुधाकर थोरात अडथळा ठरत असल्याने त्यांना संपवण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, २२ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानदेवने सुधाकर थोरात यांना दवाखान्यात घेऊन जाण्याच्या बहाण्याने साकूर मांडवे येथून राहुरीच्या दिशेने नेले. त्यानंतर कणगर शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील निर्जन ठिकाणी उपरण्याने गळा आवळून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. आकाश राजेश कावरे यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात बाजू मांडली. तपासातील बाबी आणि कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडल्यानंतर ज्ञानदेवला जामीन मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button