
फक्त रिचार्ज करायचा आणि त्यासोबत इंटरनेट, कॉलिंग, मनोरंजन अन् डिजिटल सुविधाही मिळवायच्या असतील, तर जिओचा ६२९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो ! नेमका कसा आहे हा प्लॅन ? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.
मंडळी, या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच जवळपास दोन महिने रिचार्जची चिंता नाही. दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. त्यामुळे संपूर्ण वैधतेत तब्बल ११२ जीबी डेटा वापरता येतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग ६४ केबीपीएस होतो.
याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही आहे. पात्र ग्राहकांना ट्रू ५जी अंतर्गत अमर्यादित ५जी डेटाचा लाभ मिळतो. पण या प्लॅनचं खास आकर्षण इथेच संपत नाही!
यामध्ये जिओ हॉटस्टारचं मोबाईल सबस्क्रिप्शन, ५० जीबी जिओ एआय क्लाऊड स्टोरेज आणि तब्बल १,५९० रुपये किमतीचं कॅनव्हा प्रो लाईटचं १२ महिन्यांचं सबस्क्रिप्शन मोफत मिळतं. तर मग मंडळी तुम्हाला हा प्लॅन फायदेशीर वाटतो का? कमेंट करून नक्की सांगा.





