
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यासाठी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. कारण, येथील एका तरुण कबड्डीपटूची थेट भारतीय संघात निवड झाली आहे. कोण आहे हा खेळाडू? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी प्रो कबड्डीमधील स्टार खेळाडू शिवम अनिल पटारे याची कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघात निवड झाली आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अहमदाबाद येथे ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अंतिम यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये शिवमने स्थान मिळवलं आहे.
शिवमच्या या निवडीमुळे टाकळीभानमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातील कबड्डीपटू आणि क्रीडाप्रेमींनी फटाके फोडून जल्लोष केलाय. शिवमच्या निवडीमुळे टाकळीभानच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दरम्यान, शिवमच्या यशाबद्दल त्याचे वडील अनिल पटारे सर यांचा महादेव यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवमच्या पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवमच्या या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.





