
पारनेर तालुक्यातील पुणेवाडी गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी गावातील मध्यवस्तीत तसेच हातलखिंडी रोडवरील बागल वढा परिसरात बिबट्या दिसून आला. विशेष म्हणजे गावाच्या मध्यवस्तीतच बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
मंडळी, ही बातमी तुम्ही पाहताय, पण त्याआधी अहिल्यानगरमधील अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!
बिबट्याच्या वावरामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे. लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि रात्री विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मंडळी, पुणेवाडीतील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने कोणती पावले उचलायला हवीत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!





