
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटला, तरी राज्यातील तब्बल ७८ साखर कारखाने अजूनही बंदच आहेत. पण असं का घडल? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्यात एकूण २२४ साखर कारखाने आहेत. त्यापैकी १२ नोव्हेंबरअखेर १४६ कारखान्यांचं गाळप सुरू झालंय. यामध्ये ७२ सहकारी आणि ७४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. तर उर्वरित ७८ कारखान्यांची धुराडी अद्याप पेटलेली नाहीत.
यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची स्थितीही महत्त्वाची आहे. अहिल्यानगर विभागातील २९ कारखान्यांपैकी २७ कारखाने सुरू झाले असून, दोन कारखाने अद्याप बंद आहेत. दुसरीकडे कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर विभागात ऊस गाळपाला वेग आला आहे.
राज्यात आतापर्यंत १ कोटी ८८ लाख मेट्रिक टनांहून अधिक उसाचं गाळप झालंय. त्यातून १ कोटी ६० लाख क्विंटलहून अधिक साखरेचं उत्पादन झालंय. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.३६ टक्के आहे. तर मग मंडळी, बंद असलेल्या कारखान्यांचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार का? कमेंट करून नक्की सांगा!





