Latest

अखेर अकोल्याचे गणित बदलले… लहामटेंना पराभवाचा धक्का कशी चालली संजीवनी शिंदेंची जादू?

अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. या निवडणुकीतील पहिला धक्कादायक निकाल समोर आला. अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

त्यांची लढत बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे यांच्याशी झाली. शिंदे आणि आ. लहामटे यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. अकोले सोसायटी मतदारसंघात एकूण २३१ मते होती. तेथे १०० टक्के मतदान झाल्याने धाकधूक वाढली होती.

अखेर मतमोजणी संपली तेव्हा संजिवनी शिंदे यांना ४९ मिळाली, तर पराभूत डाँ. लहामटे यांना ३६ मतांवर समाधान मानावे लागले.हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो.

लहामटे विरुद्ध सर्व अशी ही लढत झाली. त्यामुळे अकोले तालुक्यातील भविष्यातील सर्वच निवडणुकांची गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button