
शिक्षण झालंय आणि नोकरीच्या शोधात आहात ? तर तुमच्यासाठी राज्य सरकार एक मोठी संधी घेऊन येत आहे. महिन्याला ३५ हजार रुपये पगार आणि त्यासाठी फक्त १५ दिवसांचं प्रशिक्षण ! नेमकी काय आहे सरकारची योजना? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, राज्यात जमीन मोजणीचा खोळंबा कमी करण्यासाठी सरकार तब्बल ५ हजार परवानाधारक खासगी सर्वेअर नियुक्त करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही माहिती दिली.
या तरुणांना रोव्हर आणि ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर दर महिन्याला २० जमीन मोजणीची कामं पूर्ण करावी लागतील. सध्या राज्यात १२०० सर्वेअर आहेत.
नव्या नियुक्त्यांमुळे अर्ज केल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत जमीन मोजणी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. ही भरती महिनाभरात पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर मग मंडळी तुम्हाला सरकारचा हा प्लान कसा वाटला ? कमेंट करून नक्की सांगा.





