Latest

अर्णब चक्रीवादळ महाराष्ट्रात पाऊस घेऊन येणार… राज्यातील या भागात पावसाची शक्यता

ऑक्टोबर हीटने हैराण झालेल्या महाराष्ट्रात आता अवकाळी पावसाची शक्यता आहे. पण, राज्यात नेमका कुठे पाऊस पडणार? जाणून घेऊयात. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 नक्की करा.

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत असून, याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत जाणवण्याची शक्यता आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबरला हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी तिथे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात पूर्व विदर्भाला या हवामान बदलाचा अधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० ऑक्टोबरला नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर मुंबई आणि कोकण परिसरात ३० आणि ३१ ऑक्टोबरला हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, जळगावमध्ये तापमान घसरून १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वरमध्ये १७ अंश तापमानाची नोंद झाली.

मात्र, पावसाचा नेमका परिणाम स्थानिक हवामानावर अवलंबून असेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा. तुमच्या भागात पावसाची स्थिती कशी आहे कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button