
अहिल्यानगर आणि पारनेर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीला आता मोठा दणका बसलाय! तब्बल ११ जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पण ही टोळी कोणती आणि टोळीवर नेमके कोणते गंभीर गुन्हे दाखल आहेत? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, भोसले टोळीवर ही कारवाई झाली आहे. टोळीप्रमुख रमेश सावत्या भोसले आणि त्याच्या दहा साथीदारांचा या कारवाईत समावेश आहे. या टोळीने अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरातही गुन्हेगारीचं जाळं पसरवल्याचा आरोप आहे.
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, घातक शस्त्रांनी खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि अल्पवयीन मुलीची छेडछाड अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद या टोळीविरुद्ध आहे. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
सुपा पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आता पुढील तपास नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने करत आहेत.
तुमच्या मते, अशा कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसेल का? कमेंट करून तुमचं मत सांगा.





