
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये एका विवाहितेच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ निर्माण झालाय. मुलीच्या आत्महत्येमुळे संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाईकांनी थेट सासर गाठलं आणि तिथे राडा घातल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलंय? सगळं काही जाणून घेऊयात पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
पढेगाव येथील सुकन्या घोडे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. ही घटना लक्षात आल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरच्या नातेवाईकांना माहिती दिली.
त्यानंतर आलेल्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांना मारहाण केली, घरातील टीव्ही, सीसीटीव्ही यंत्रणा आणि फर्निचरची तोडफोड केली, तसंच दागिने आणि रोकड नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर संतप्त माहेरच्या लोकांनी विवाहितेचा मृतदेह सासरच्या घरासमोर जाळल्याचाही दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमागील नेमकी कारणं आणि सर्व आरोपांचा तपास होणं महत्त्वाचं आहे. या घटनेबाबत तुमचं मत काय? कमेंट करून सांगा.





