Latest

धनत्रयोदशी ६ की ७ नोव्हेंबरला ? सोनं-चांदी खरेदी करण्याआधी जाणून घ्या शुभ मुहूर्त !

दिवाळीच्या खरेदीची तयारी करताय ? मग धनत्रयोदशीची तारीख आणि शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी, पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशी ६ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.

हिंदू परंपरेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. तसंच अनेक जण सोनं, चांदी आणि नवीन वस्तूंची खरेदी करतात.

द्रिक पंचांगानुसार, त्रयोदशी तिथी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरू होऊन ७ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी संपेल.

तर पूजेचा शुभ मुहूर्त ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजून १८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून १० मिनिटांपर्यंत सांगितला आहे. खरेदीसाठीही ६ नोव्हेंबरपासून मुहूर्त सुरू होत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तर मग मंडळी, यंदा धनत्रयोदशीला तुम्ही काय खरेदी करणार? सोनं, चांदी की नवीन वस्तू? कमेंट करून नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button