Latest

Apple चा मोठा निर्णय ! आता भारतात एका ग्राहकाला फक्त इतकेच iPhone खरेदी करता येणार, कसा आहे नवा निर्णय ?

नवीन iPhone खरेदी करायचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठीचं आहे! अँपलने भारतासह अमेरिकेत काही iPhone मॉडेल्सच्या खरेदीवर मर्यादा लागू केल्याची माहिती समोर आली आहे. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी नव्या नियमांनुसार, एका ग्राहकाला ठराविक मॉडेलचे दोनपेक्षा जास्त फोन खरेदी करता येणार नाहीत. यामध्ये iPhone Duo, iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max यांसारख्या मॉडेल्सचा समावेश असल्याचं वृत्त आहे. तसेच iPhone 17 मालिकेतील काही मॉडेल्सवरही ही मर्यादा लागू असल्याचं सांगितलं जात आहे.

नवीन फोनची वाढती मागणी, काळाबाजार रोखणं आणि जास्तीत जास्त ग्राहकांना फोन उपलब्ध करून देणं, ही यामागची संभाव्य कारणं असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, ही मर्यादा सर्व iPhone मॉडेल्सना लागू आहे, असं समजू नका. खरेदी करण्यापूर्वी Apple च्या अधिकृत वेबसाइटवरील नियम तपासा. तुमच्या मते, एका ग्राहकाला दोनच iPhone खरेदी करण्याची मर्यादा योग्य आहे का? कमेंट नक्की करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button