
मित्रांसोबत पार्टी करायची म्हटलं की बिअरची चर्चा होतेच. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतात एका बिअरची बाटली २०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत असून ती भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बियर आहे. या बिअरचं नाव नेहमीचं चर्चेत असते. पण तरीही अनेकांना या ब्रँडचे नाव माहिती नाही.
तर मंडळी या बिअरचं नाव आहे ‘डेअरडेव्हिल’. ही बिअर तिच्या स्ट्राँग प्रकारामुळे ओळखली जाते. मात्र, तिची नेमकी किंमत किती असेल, हे तुम्ही कोणत्या राज्यात आहात आणि बाटलीचा आकार किती आहे, यावर अवलंबून असू शकतं.
कारण भारतात मद्यावरील कर आणि उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्यामुळे राज्यागणिक किंमती बदलतात. त्यामुळे एका ठिकाणी मिळणारी किंमत दुसऱ्या राज्यात असेलच, असं नाही.
मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा. मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषतः जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृतासह शरीराच्या इतर अवयवांनाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे केवळ कमी किंमत पाहून मद्यपान करणं योग्य नाही.





