
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार? सध्या राज्यभरातील लाखो महिलांना याच प्रश्नाचं उत्तर हवं आहे. कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस मिळाला होता.
आता दसऱ्याला १५०० रुपये मिळणार की दिवाळीत दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये खात्यात येणार, याची उत्सुकता वाढली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सप्टेंबरचा हप्ता स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय झाल्यास दसऱ्यानंतर शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ ऑक्टोबरनंतर पैसे टप्प्याटप्प्याने जमा होऊ शकतात.
मात्र, ऑक्टोबरअखेरपर्यंत पैसे न मिळाल्यास दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये दिवाळीत मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख लाभार्थी महिलांना या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे कधी येणार, याचं उत्तर मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल!





