Latest

भिंगार विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पोलिसांचा लाठीचार्ज अन एका तरुणाचा दुर्दैवी अंत ! नेमकं काय घडलं ?

भिंगारमधील विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्ज झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, गाणी वाजवणे आणि गुलाल उधळण्यावरून पोलिसांकडून मंडळांना अडवण्यात आलं.

आमदार संग्राम भैयांचं गाणं वाजवल्यानंतर आवाज कमी करण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला. दोन बेस आणि दोन टॉपला पोलिसांनी परवानगी दिली होती, असंही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीनंतर लाठीचार्ज सुरू झाल्याचा आरोप केला आहे. गाणं बंद करण्याच्या सूचनेनंतर वाद वाढल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून तरुणांना मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला.

दरम्यान, लाठीचार्जमध्ये दीपक वागस्कर यांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button