
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. मात्र, आता महिन्याच्या उत्तरार्धात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
डख यांच्या अंदाजानुसार, 16 सप्टेंबरला राज्यात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. 17 आणि 18 सप्टेंबरला पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस होण्याचा अंदाज आहे.
अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि जालना या भागांचाही अंदाजात समावेश आहे.
तसेच 24 सप्टेंबरनंतर समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यास 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो, असा डख यांचा दावा आहे.





