Latest

अहिल्यानगरमधील अवैध खडी क्रशर पुन्हा सुरू, ६ मालकांवर गुन्हा दाखल! नेमक काय आहे प्रकरण?

अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महसूल विभागाने बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या आरोपाखाली तालुक्यातील तब्बल ६३ स्टोन क्रशर युनिट्सना सील ठोकले होते. मात्र प्रशासनाचे आदेश धुडकावत काही मालकांनी क्रशर पुन्हा सुरू केल्याचे उघड झाले आहे.

कापूरवाडी परिसरात सकाळी सातच्या सुमारास पथकाने अचानक पाहणी केली असता सहा क्रशर युनिट्स सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित सहा मालकांविरोधात नगर कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाची पाळेमुळे विधानमंडळ अंदाज समितीच्या अहवालापर्यंत पोहोचतात, ज्यात जिल्हाधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

वीज वितरण कंपनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय क्रशर सुरू करण्यास मनाई असतानाही हा प्रकार घडला. प्रशासन आता पुढे काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button