
तोफखाना पोलिसांनी पकडलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणात 25 पेट्यांचे डील करणाऱ्या दोन खास कर्मचाऱ्यांवर नेमकी कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दोन्ही कर्मचारी पोलीस ठाण्याच्या साहेबांचे खास आहेत. त्यांचा साहेबांच्या अवतीभवती वावर असतो.
हा व्यवहार साहेबांच्या परस्पर झाला असला, तरी ते दोन्ही दादा साहेबांचे स्पेशल व्यक्ती आहेत. त्यामुळे असे काही केलेच नसल्याचे अविर्भावात दोघेही आहेत. डील मुळे हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे गेला, मात्र डील करणारे मोकाट आहेत.
विशेष म्हणजे त्यातील एकावर खात्यांतर्गत कारवाई झाली होती. तरीही साहेब डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत. साहेबांच्या परस्पर हे अनेक उद्योग करतात.
एमडी ड्रग्स प्रकरणात ज्यांच्याकडून खिसे भरून घेतेले तेही नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात आहे. या दोघांबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे जिल्हा पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.





