
अहिल्यानगरच्या १४ गावांकडे तब्बल १६१ कोटींची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती हाती आलीये. नेमक काय आहे संपूर्ण प्रकरण ? सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, अहिल्यानगरमध्ये एकीकडे दुष्काळाचं संकट आणि दुसरीकडे पाणीपट्टी वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेच्या जलवाहिनीतून पाणी घेतलेल्या १४ ग्रामपंचायतींकडे व्याजासह तब्बल १६० कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे.
विशेष म्हणजे, यापैकी अनेक गावांचा पाणीपुरवठा थकबाकीमुळे अनेक वर्षांपासून बंद आहे. संबंधित गावांनी पर्यायी जलस्रोतांची व्यवस्था केली आहे.
सध्या विळद-गवळीवाडी, देहरे आणि शिंगवे नाईक या तीन गावांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. या गावांकडेही एकूण तब्बल ४ कोटी ३ लाख ५४ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे.
या गावांना दरमहा सुमारे साडेतीन एमएलडी पाणी दिलं जातं. आता, १६ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या शासनाच्या आदेशानुसार या गावांनाही १० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून, पैसे न भरल्यास पुढील कारवाईचा इशाराही दिला आहे. या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





