
मंडळी अमेरिकेतील ‘मॅरेथॉन फ्यूजन’ कंपनीने चक्क प्रयोग शाळेत सोनं तयार करण्याचा दावा केला आहे. नेमक प्रकरण काय ? सगळं सांगतो. त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी या कंपनीने पाऱ्यापासून सोने तयार करण्याचा प्रयोग केल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी अणुरूपांतरण या प्रक्रियेचा वापर करण्यात आला.
म्हणजेच, एका मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकात बदल करून दुसरं मूलद्रव्य तयार करणं. कंपनीने मर्क्युरी-१९८ या पाऱ्याच्या समस्थानिकाचं मर्क्युरी-१९७ मध्ये रूपांतर केलं. त्यानंतर त्यातून स्थिर सोनं तयार होऊ शकतं, असा दावा आहे.
याआधी युरोपमधील सर्न प्रयोगशाळेनेही अशाच प्रकारे सोन्याची अणुकेंद्रकं तयार केली होती. मात्र, त्यांचं प्रमाण अत्यंत कमी होतं. मात्र, सध्या तरी या तंत्रज्ञानामुळे सोनं स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे.
कारण या प्रक्रियेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी मोठा खर्च, प्रगत सुविधा आणि किरणोत्सर्गाच्या सुरक्षिततेची आव्हानं आहेत. म्हणजेच, प्रयोग यशस्वी झाला तरी बाजारात स्वस्त सोनं येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. पण भविष्यात प्रयोगशाळेत तयार केलेलं सोनं बाजारात येईल का? कमेंट करून सांगा!





