
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. काय आहे नवीन अपडेट? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
शेतकरी मित्रांनो, यंदाच्या कापूस हंगामाच्या सुरुवातीलाच दिलासादायक चित्र समोर आलंय. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव बाजारपेठेत कापसाचा दर थेट ९ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलाय.
विशेष म्हणजे, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापारीही इथं कापूस खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत राळेगाव बाजार समितीत सुमारे १ हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. दुसरीकडे, सीसीआयकडून यवतमाळ जिल्ह्यात १९ केंद्रांवर कापूस खरेदीचं नियोजन करण्यात आलंय.
मात्र, काही शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर कापूस पेरणीची नोंद नसल्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी येत आहेत. खासगी बाजारात ९,५०० रुपये, तर सीसीआयच्या हमीभावावर आधारित दर ८,२०० ते ८,६१७ रुपये आहे. तर मग मंडळी तुमच्या भागात कापसाला किती भाव मिळतोय? कमेंट करून नक्की सांगा.





